CBI beast running wild under BJP rule Vinay Katiyar

88 views · Published 22 April 2017 · 0:57 · Indexed 6 November 2026

Channel: Loksatta · 2017 · Entertainment

Watch on YouTube

भाजपची सत्ता आल्यानंतर सीबीआय खाते हिंस्त्र श्वापदासारखं मोकाट सुटलंय , अशा शब्दात भाजपचे नेते विनय कटियार यांनी स्वपक्षावर तोंडसुख घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी बाबरी मस्जिद खटल्याच्या निकालाप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विनय कटियार यांनी हाच धागा पकडत सीबीआयला लक्ष्य केले आहे. बाबरी मस्जिद खटल्यात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग आणि अन्य जणांविरोधात नव्याने गुन्हेगारी आरोप दाखल करण्यात यावे, अशी विनंती सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली होती. या पार्श्वभूमीवर विनय कटियार यांनी सीबीआयने काही लोकांविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला.

More from this channel