We Are Ready To Debate Dont Doubt Our Integrity Says Rajnath Singh

29 views · Published 28 November 2016 · 1:07 · Indexed 14 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

नोटाबंदीच्या निर्णयानंतर संसदेतील कामकाज सातत्याने ठप्प होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेमध्ये सरकारच्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावरील चर्चेत सहभागी होतील, असे आश्वासन विरोधकांना दिले. देशातील काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या लढाईचा एक भाग म्हणूनच जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणीही या निर्णयाचा थेटपणे विरोध केलेला नाही, असेही त्यांनी यावेळी विरोधकांना सुनावले.

More from this channel