How To Play Bailgada Sharyat : Gaikwad bhandu
138 views · Published 23 July 2017 · 0:29 · Indexed 28 October 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
बैलगाडा शर्यतीवरील बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं अवघ्या मराठी मुलखातील बळीराजा एकदम खूश झालाय. दावणीच्या ढवळ्या-पवळ्यावर जीवापाड जीव लावणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. परंतु, बंदीमुळं त्यांचं याडंच पळालं व्हतं. आता या शर्यती पुन्हा सुरू होतील. जत्रा-यात्रांमधून बैलं धावतील, फुफाट्यात आभाळाला भिडणारी भिर्ऱर्ऱ अशी आरोळी ऐकायला येईल, टोप्या आणि फेटे उडतील, एकूणच काय तर मातीत राबणाऱ्या हातांची तब्येत एकदम खूश होऊन जाईल. निमगावच्या घाटात फळीफोड खेड तालुका बैलगाडा चालक-मालक संघटनेनं निमगाव (खंडोबा) घाटात बैलगाडा शर्यतीची फळीफोड करून आपला आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळं बऱ्याच दिवसांनी शर्यतीचा आनंद लुटता आल्यानं पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येंनं उपस्थित होते. जत्रांना येईल बहार... जत्रा म्हटलं की कुस्त्यांचा आणि तमाशाचा फड तसंच बैलगाडा शर्यती आल्याच. मात्र न्यायालयानं शर्यतींवर बंदी घातल्यानं जत्रांमधील जानच गेली होती. आता बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानं जत्रांना बहार येईल बघा... अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City