key points from PM Modi's Independence day speech
288 views · Published 15 August 2016 · 2:17 · Indexed 25 October 2026
Channel: Loksatta · 2016 · Entertainment
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. तब्बल दीड तास चाललेल्या त्यांच्या भाषणाचा मुख्य रोख व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुराज्याच्या ध्येयावर राहिला. भारताला प्राप्त झालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करणे ही देशातील १२५ कोटी जनतेची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच भारतापुढे अनेक समस्या असल्या तरी ते सोडविण्याचे सामर्थ्यही भारतातील जनतेकडे असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या कामगिरीमुळे व्यवस्थेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात कशाप्रकारे बदल झाले आहेत, हे त्यांनी जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा दाखला दिला. तसेच नव्या सरकारच्या काळात योजनांची परिमाणकारक आणि वेगाने अंमलबजावणी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil