Mumbai Goa Highway Bridge Collapse : ST Bus Wreckage Found

2,425 views · Published 11 August 2016 · 1:06 · Indexed 8 November 2026

Channel: Loksatta · 2016 · Entertainment

Watch on YouTube

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्याने पाण्यात पडलेल्या दोन बसचा शोध घेण्यात अखेर नौदलाच्या पथकाला यश आले असून, घटनास्थळापासून साधारणपणे १७० ते २०० मीटर अंतरावर बसचे काही अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असून, त्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढण्यात येतील. पाण्यात वाहून गेलेल्या एसटीच्या दोन बस शोधण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. नौदलासोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवानही घटनास्थळी पाण्यात बुडालेल्या प्रवाशांचा आणि गाड्यांचा शोध घेत होते.

More from this channel