how to swim Puna India
509 views · Published 4 December 2017 · 4:50 · Indexed 21 September 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
सणसवाडी पुणे : - आम्ही पोहण्यासाठी अनेक वर्षे सणसवाडीतील विहिरीचा उपयोग करत आहे. मी शाळेत इयत्ता पाचवीला असताना तेंव्हा ओढ्यावर पोहायला जात असत. मग मी लहान असल्यामुळे घरच्यांना सांगायचो मला पोहायला येत आहे. पण मला पोहायला येत नव्हतेच मुळी हो. पण आमचे थोरले बंधू यांनी हे पक्के ओळखले होते. त्यांनी मग माझी कानउघडणी केली होती. मग मला त्यांनीच पुढे शिकविले पोहायला.
आम्ही अनेक मित्र म्हणजे शेजारचे आणि वर्गमित्र पण आले त्यात असे एकत्र पोहायला जायचो. खूप धमाल करायचो त्यावेळी आम्ही. पोहायला गेल्यावर कोण जास्त वेळ बुडी मारून पाण्यात थांबतो अशी स्पर्धा लागायची आमची. तेंव्हा गावाच्या बाहेर एक हरगुडे बंधूंची विहीर होती. आमच्यात तेंव्हा पोहायला हरगुडे आडनावाचे मित्र पण असायचे. पण विहीर हि सर्व भावकीतील होती त्यामुळेच एक महादेव हरगुडे नावाचे गृहस्थ खूप रागाने यायचे आणि आमची कापड पळून घेऊन जायचे. मग आम्ही त्याना विनंती करायचो ते पण खूप प्रेमाने परत करायचे. आमच्या खोड्या आणि आठवणी लिहीन तितक्या कमीच आहे पण आठवणीचा ठेवा संपता संपणार नाही हे मात्र नक्की नाही तर नक्कीच म्हणायला हवे....
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लहान मुलांना आणि मुलींना पोहण्यास शिकवत आहोत. मुलांना विहिरीत पोहायला शिकविण्याचे आमचे एक तंत्र आहे. आम्ही लहान मुलांना पोहायला शिकविताना प्लास्टिकचे डब्बा बांधून विहिरीत सोडत असतो. किंवा मुलांच्या कमरेला दोरी बांधून त्याला विहिरीच्या कठड्यावरून टाकत असतो. पण पूर्वी भारतात पांगारा झाडाचे वाळलेले लाकूड तोडून तीन लहान तुकडे जोडून बांधून ते कमरेला पक्क आणि घट्ट बांधून पोहायला घालत असे....साधारण दोन महिने दररोज एक किंवा दोन वेळेस म्हणजे सकाळी आणि दुपारी सराव करायला लागतोच. म्हणजे दोन ते तीन महिन्यात पोहायला शिकता येते. महत्त्वाचे म्हणजे माणूस हा पाण्यात पुडत नसतो. पण मरणाच्या भीतीने घाबरून हातापायाची हालचाल न केल्याने माणूस पाण्यात बुडतो.
पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि व क्रीडा प्रकार सुद्धा आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले असते. पोहण्याची कला आदिमानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच अवगत असावी असे मानले जाते. भारतीय साहित्यात पोहण्याचे असे उल्लेख
आढळतात. जसे की कृष्ण व कालिया मर्दन या कथेत कृष्णाचे यमुना नदीत पोहायला जाणे.
पोहणे हा एक ऑलिंपिकचा खेळ आहे. या शिवायही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र येथे महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशन तर्फेही स्पर्धा होतात. अनेक जिल्हा जलतरण संघटना अशा स्पर्धा आयोजित करतात.
जलतरण हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ आजवरच्या सर्व आवृत्त्यांत खेळवला गेला असून ॲथलेटिक्सखालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक (३४) प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. जलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो. हे झाले शहरी आणि जिथे स्पर्धा असते ते शहरातील वर्णन आणि माहिती. पण ग्रामीण भागात सिंचनासाठी खोदलेल्या विहिरी, तळे आणि तलाव, ओढे, नाले आणि नद्यांमध्ये पोहायला जाण्याची पद्धत आहे. याच प्रमुख प्रहावत पोहायला शिकविले जाते. पोहयला शिकले कि ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयोगी पडत असते.....
follow me, Please LIKE and do not forget to hit button SUBSCRIBE
follow me on #YouTube Channel
http://www.youtube.com/c/ALessonOfTimeDreemLife
follow me on #Facebook - Arjun Said
https://www.facebook.com/arjunsaid1977
follow me on #INSTAGRAM -
https://www.instagram.com/shree_arjun_said/
follow me on #Facebook_Page
Sunbird Business Solution
https://www.facebook.com/sunbird1977/
follow me on #twitter
https://mobile.twitter.com/ShreeSaid
follow me on #tumblr
https://www.tumblr.com/blog/arjunblahanbasaid
follow me on #LinkedIn
www.linkedin.com/in/arjunsaid
follow me on #bolspot
https://arjunbusiness.blogspot.in/
follow me on #Google_plus
https://plus.google.com/u/0/+ALessonOfTimeDreemLife
Please Contact me [email protected] Only Email.....
More from this channel
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
4:58
Shivjayanti Speech In Sanasawadi Pune
-
0:47
Game wagholi mela Wagholi Pune
-
0:57
How to swim well India
-
34:03
Sambhaji Maharaj | Bahu Tulsikar Sangali
-
7:42
Sambhaji Bhide Gurruji Bhashan | Mohim Samarop 2016
-
0:31
बैलगाडा शर्यत | gaon gada गावगाडा | Bull | Khilar Bail
-
0:27
Bullok Cart Race | gaon gada गावगाडा | बैलगाडा शर्यत