How To Run Bailgada Sharyat। Rajusheth Jawalekar

1,793 views · Published 21 May 2017 · 0:39 · Indexed 17 October 2026

Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles

Watch on YouTube

बैलगाडा शर्यत ....
काय आहे बैलगाडा शर्यत?
बैलगाडा शर्यत हि खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, मावळ, शिरुर तालुक्यातील यात्रांचे वैभव आहे. शेतकरी घराण्याची परंपरा जपणारा हा एक मर्दानी खेळ आहे. ज्याला परंपरा आहे शंभराहुन अधिक वर्षांची. बैलगाडा म्हणजे २० ते २५ किलो वजनाचा सांगाडा. बैलगाडा शर्यतीमध्ये गाड्यावर माणुस स्वार होत नाही, हा या शर्यतीचा नियम आहे. बैलगाडा धावण्यासाठी असलेली धावपट्टी /घाट याची लांबी १०० ते १५० मीटरच असते. बैलांना हा गाडा घाटातुन १०० मीटर पळवित न्यायचा असतो, पण गाड्यावर स्वार नसल्याने बैलांवर घाट पार करण्याची जबरदस्ती नसते. बैलगाडा या घाटातुन मुक्त धावत असताना संयोजक या गाड्याचे सेकंद मोजतात आणि या सेकंदावर त्या बैलगाड्याचा क्रमांक ठरविला जातो. उदा.- १२ सेकंद पहिला, १३सेकंद दुसरा, १४सेकंद तिसरा क्रमांक याप्रमाणे क्रम ठरविला जातो. अशी आहे हि बैलगाडा शर्यत आणि तिचे स्वरुप असते.

कशी असतात शर्यतीची बैलं?
शर्यतीसाठी वापरली जाणारी बैल ही खिल्लारी जातीची पंढरपुरी, गावरान तसेच म्हैसुर जातीचीच असतात. बैलगाडा शर्यतींसाठीची बैलं ही खास या शर्यतींसाठीची पाळली जातात. ही बैलं शेतीच्या कामाला वापरली जात नाहीत, कारण शेत कामासाठीचा शांतपणा या शर्यतीँच्या बैलांमध्ये नसतो. शर्यतीची बैलं वर्षभर गोठ्यात बांधुन असतात. बैलांची ताकत चपळता आणि त्यांची पळण्याची क्षमता वाढावी म्हणुन या बैलांना गव्हाचे पीठ, पेंड, सरकी, मका, कडबा, वैरण, तेल, अंडी आणि हिरवा चारा अशा प्रकारच्या खाद्यांचा रतीब असतो. शर्यतीच्या वेळेसच गोठ्याबाहेर काढला जाणारा हा बैल आवरण्यासाठी पाच-सहा माणसांच माणुसबळ कामी येत. त्यासाठी या बैलांना दारु अथवा उत्तेजक द्रव्य पाजण्याची गरज नसते.

*बैलांच्या तोंडातुन येणारा फेस-
बैल, गाय आणि म्हैस या जनावरांच्या रवंथ या प्रक्रियेमुळे त्यांच्या तोँडाला कायमच फेस येत असतो. शिवाय या जनावरांच्या नाकात असलेल्या वेसणीमुळे ही जनावरे कायम आपल्या नाकपुड्या चाटत असतात त्यामुळे तोँडातला फेस बाहेर येत असतो.

*बैलांचा छळ केला जातो-
बैलांचा छळ केला जातो या विधानाबाबत आम्ही संभ्रमात आहोत. कोणत्या प्रकारचा छळ? धावपट्टीच्या सुरवातीला बैलं गाड्यास जुंपली जातात आणि ती मो

More from this channel