Shivsena Criticise Devendra Fadnavis And Mns Over A Dil Hai Mushkil Row
67 views · Published 24 October 2016 · 1:21 · Indexed 27 October 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना महत्त्व देऊन मध्यस्थी केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर मांडवली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी करण्याऐवजी ठोस भूमिका घेऊन पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नका, लोकभावना संतप्त आहे, असे निर्मात्यांना बजावायला हवे होते, असे सेनेने अग्रलेखात म्हटले आहे. तर दुसरीकडे सिनेमागृहाचे पडदे जाळण्याची भाषा करणारे आता तेच ‘पडदे’ अंगावर पांघरून शांतपणे पहुडले आहेत, असा टोलाही सेनेने मनसेला लगावला आहे.
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil