Narsingh Yadav Banned For Four Years, Out Of Rio 2016 Olympics

286 views · Published 19 August 2016 · 1:43 · Indexed 25 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून क्रीडा लवादने त्यांच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा स्वप्नांवर विरजण घातले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने ऑलिम्पिक खेळण्यासाठी चार वर्षांची बंदी घातली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता.

More from this channel