भक्तीगंगा आणि शक्तीगंगा संगम पुणे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

415 views · Published 19 June 2017 · 2:47 · Indexed 8 November 2026

Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles

Watch on YouTube

भक्तीगंगा आणि शक्तीगंगा संगम पुणे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 
तुका म्हणे ऐसा नरा मोजून मारा पैजारा...
बर्गेडी बांडगूळाना बसणारे तंतोतंत वाक्य
वारकरी धारकरी संगम म्हणजेच भक्तीगंगा शक्तीगंगा संगम
शिवरायांच्या प्रति असलेली साधु-संतांप्रती श्रद्धा व त्यांच्या पासून मिळणारी देव देश धर्मासाठी ऊर्जा व आशीर्वाद ही परंपरा कायम ठेवण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वारी स्वागत व पालखी दर्शन करत असतो. शिवकाळात इस्लामी आक्रमक या संतांच्या दिंडीवर आक्रमण करत असत म्हणून महाराज स्वतः दर्शन घेऊन त्या दिंडीना संरक्षण देत असत, काही काळानंतर यास खंड पडला व ते पुन्हा श्री संभाजी महाराजांच्या वारकर्यांना दिलेल्या आश्वासनाने शस्त्रधारी सैनिक दिंडीत जात असत तीच परंपरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकर्यांनी सुरू केली आहे, आता काही लोक म्हणतील दर्शन ठीक आहे. पण शस्त्र कशाला हवे तर त्यांना सांगू इच्छितो मागल्या वर्षी पोलीस प्रशासन असताना सुद्धा काही धर्मांध कट्टरवाद्यांनी यवतमाळ मध्ये दिंडीवर दगडफेक केले; मग हे आजकालचे मुघल नाहीत का?
काल काही बातमीकरांनी चुकीची बातमी लावून जनतेत शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांविषयी असंतोष व टीका निर्माण केली, आणि अर्धे जे त्या कार्यक्रमात होतेही नाही असे भुंकून राहलेत, खरतर काल सर्वेच पालखी दर्शन करत होते पण ते श्रद्धेपोटी, त्याला गोंधळ म्हनत नाही त्याला उलट धारकरी हे भर उन्हात रस्त्यावर बसून दर्शन घेत होते, धारकऱ्यांच्या शिस्ती बद्दल तर यांनी बोलूच नये .
शिस्त पहायची असल्यास लाखो लोक गुरुजींच्या आदेशाने खाली बसतात वाटल्यास गडकोट मोहिमेत येऊन बघा.
2008 पासून भक्ती गंगा शक्ती गंगा कार्यक्रम सुरु झाला,
तेव्हापासून कुठलाही गालबोट लागलं नाही.
खेडेकर चा पुरस्कार परत घ्या म्हणून शिवप्रतिष्ठान ने कधीही पालखी थांबवली नाही, किंवा अडवून रोखवली नाही
संभाजी महाराजांच्या आदेशावरून आणि सुरक्षेची हमी देऊन खंड पडलेल्या वारीस पून्हा सुरुवात झाली
त्यालाच आम्ही प्रतीक म्हणून भक्ती गंगा शक्ती गंगा सूरू केली. महाराजनीं सशस्त्र सुरक्षा दिली होती. त्या सशस्त्र सुरक्षेच प्रतीक म्हणून आम्ही भक्ती-शक्ती गंगा मध्ये शस्त्र पथक ठेवले होते. एवढ्या वर्षात शस्त्र पथकामुळे कधीच वरील गालबोट लावलं नाही. दर वर्षी वारीवर टीका करणार्यांनी आज वारीबद्दल एवढा जिव्हाळा दाखवून ते ढोंगी आहेत. हेच पुन्हा पुन्हा सिद्ध केलं आहे. धारकरी दर वर्षी वारकऱ्यांची काळजी घेत भक्ती शक्ती मध्ये सामिल होतात. प्रत्येक धारकरी कोणाला त्रास होऊ नये याचीच दक्षता घेत असतो. रस्त्याने चालताना ५ - ५ चा रांगेत जात होते सर्व शिस्तीत आणि गुरुजीसुद्धा आमचा सोबतच रांगेत होते .खूप धारकरी प्रशासनाचे कार्य स्वतः गर्दी व वाहतूक सांभाळत होते
आम्हाला वारीची आणि भक्तीची जाण आहे, म्हणूनच तिथे आलो.
वारी ही जर सर्वधर्माची होती तर इतर धर्मीय दिसले नाहीत वारीत व दर्शनात काल.
काही लोक म्हणत होते की धारकरी हट्ट करून दर्शन घेत होते अरर उलट गुरुजींना तुकाराम महाराज पालखी प्रमुखांनी स्वतः गुरुजींना पालखीत बसवून मान दिला, त्याचा व्हिडीओ पण आहे.
2 पालखी गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला आणखी खूप वेळ होता जवळपास 12 तास तर मग धारकरी वारीच्या मागे निघालेत व कोणालाही त्रास न होता समोर समारोप स्थानी गीत मनत निघालेत, समारोप सुद्धा वारीच्या रस्त्याच्या बाजूने छत्रपती संभाजी महाराज मूर्तीसमोर झाला नंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली व सर्वांनी जागेवरून दर्शन घेतले उलट गुरुजींनी सुद्धा , काही लोक व पत्रकार ओरडत आहेत की गुरुजींनी व धारकर्यांनि हट्ट करून ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले अरे तुम्ही होता का तिथे.
तुकाराम महाराजांचे 10 वे वंशज श्री अभिजित मोरे सुद्धा म्हणतात की, " मी आज प.पू.श्री.गुरूवर्य.संभाजीराव भिडे गुरूजींना भेटलो,त्यांचे विचार ऐकले......
त्यांच्या बोलण्यात कसले हि राजकारण मला तरी वाटत नाहि!!!
त्यात ह्या लोकांनी शस्त्र आणलेले नव्हते त्यांना त्या बाबत पहलेच कल्पना दिलेली होती आणि
हो, धारकरी हे रक्षण करण्यासाठीच असतात.
असं मला वाटते. मी पत्रकारांना ह्याबाबत सांगितलेले आहे मला फोन आला होता, त्यांनी मला विचारले या
बाबतीत तुमचे मत काय आहे...?
तुमचा त्यांना विरोध आहे का...?
मी, स्पष्टपणे 'नाहि' सांगितले आहे.
वरील सर्वांनी यावे,
तुकाराम महाराज सांगतात
'येरे येरे लहान थोर,जातिभेद नसावा...'
मग हे जरी आले तरी ते वारकरीच आहेत मग,
त्यांना विरोध का...?
हि बातमी मी त्यांना दिली आहे. " उलट हा वाद काही राजकारणी व प्रशासनातील आहे आणि बदनाम शिवप्रतिष्ठान ला केल्या जात आहे. 
गुरुजींना अनेक पोलीस प्रशासन, पोलीस मित्र, वारकरी, सुरक्षा दल,अग्निशामक दल,स्थानिक मंडळाचे सभासद,गृहस्थ,स्थायिक,राजकारणी, भेटून आशीर्वाद घेत असताना आम्ही स्वतः पाहिलेले आहे ,पूर्ण वेळ गुरुजींसोबत होतो पण कसला कुठे वाद दिसला नाही उगाच धारकरी वारकरी संगमाला गालबोट लावू नका.
सौरभ नारायणराव गोल्हर
धारकरी 
वरोरा (चंद्रपूर)
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

More from this channel