Maharashtra Cabinet Decision Ebc Scheme Pattern Revised

265 views · Published 13 October 2016 · 0:58 · Indexed 20 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी ही योजना लागू होती. आता ती सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेसोबतच अन्य दोन मोठ्या योजनांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनांसाठी यंदा सुमारे एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः इंजिनिअरिंग, मेडिकल व व्यावसायिक शिक्षणासाठी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

More from this channel