Bailgada sharyat pune
3,423 views · Published 19 September 2016 · 0:16 · Indexed 28 September 2026
Channel: Om Said · 2016 · People & Blogs
बैलगाडा : Bailgada sharyat pune बैलगाडा शर्यतीवरील बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं अवघ्या मराठी मुलखातील बळीराजा एकदम खूश झालाय. दावणीच्या ढवळ्या-पवळ्यावर जीवापाड जीव लावणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. परंतु, बंदीमुळं त्यांचं याडंच पळालं व्हतं. आता या शर्यती पुन्हा सुरू होतील. जत्रा-यात्रांमधून बैलं धावतील, फुफाट्यात आभाळाला भिडणारी भिर्ऱर्ऱ अशी आरोळी ऐकायला येईल, टोप्या आणि फेटे उडतील, एकूणच काय तर मातीत राबणाऱ्या हातांची तब्येत एकदम खूश होऊन जाईल. Bailgada Sharyatतूर्तास परवानगी बैलगाडा शर्यतीवर हाय कोर्टानं डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खेड तालुका बैलगाडा चालक-मालक संघटना, तसंच भंडारा इथले प्रभाकर सपाटे यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून बंदी उठवण्याची मागणी केली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती दिली आहे. त्यामुळं अंतिम निकाल लागेपर्यंत बैलगाडा शर्यतींना तूर्तास परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं असून, बैलगाडा शर्यतीदरम्यान काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांचं पालन शर्यतीदरम्यान करावं लागणार आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि राधाकृष्णन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगिती कायम राहील. बैलांचा छळ होऊ नये म्हणून काही नियम आणि अटी घालून देण्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलं. त्या अटींचं पालन करून परवानगी मिळाली. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्यावतीनं संजय खर्डे, मार्ला पल्ले आणि बैलगाडा चालक-मालक संघटनेच्यावतीनं उदय ललित या वकिलांनी युक्तिवाद केला.
More from this channel
-
0:44
Aai Ude Ude GA Ambe Aai Ude Ga Ambabai | De Dhakka | Full Song | Marathi Song
-
4:17
How To World Best Building Slab
-
4:39
रायगड किल्ला। ।बत्तीस मन सुवर्ण सिंहासन संकल्प। अपंग धारकरी गड उतरताना
-
1:35
Web Cam Capture Amezin Video : Om Said Sanaswadi Pune
-
1:16
How to swim - उन्हाळ्यात पोहायची मजा
-
4:02
How to swim sanaswadi
-
0:47
WebCam Capture Amezin Video : Om
-
0:41
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा। इंद्रायणी नदी घाट