Water logging in Parel, Hindmata areas of Mumbai

922 views · Published 5 August 2016 · 1:06 · Indexed 29 October 2026

Channel: Loksatta · 2016 · Sports

Watch on YouTube

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणा-या लोकल सेवेवर परिणाम झाला असून, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन दादर स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक ही ठप्प झाली आहे. सायन रेल्वे ट्रकवर पाच ते सहा इंच पाणी साचले आहे त्यामुळे वाहतूक कोलमडली आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पश्चिम रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने तर हार्बर मार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुसळधार पावसाने रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबई शहरात शुक्रवारी सकाळी दोन तांसात ३१ मिमी तर उपनगरांमध्ये १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

More from this channel