M S Dhoni The Untold Story Sets A New Record In Box Office By Its Third Day Collection

166 views · Published 3 October 2016 · 1:42 · Indexed 10 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर आणि गाण्यांची एकच चर्चा रंगत होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळालेली. सरतेशेवटी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘माहि’च्या मैदानातील दमदार खेळीप्रमाणेच चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार खेळीला सुरुवात केली. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल ६६ कोटींची कमाई केल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

More from this channel