Schedule For 212 Municiple Council Election Declared

69 views · Published 17 October 2016 · 0:58 · Indexed 14 November 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

राज्यातील २१२ नगरपरिषदांमधील निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२१२ नगरपरिषदांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून २७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांमधील सर्वाधिक म्हणजेच १६५ नगरपरिषदांमध्ये मतदान पार पडेल. दुस-या टप्प्याचं मतदान १४ डिसेंबरला पार पडणार असून यामध्ये लातूर आणि पुण्यातील १४ नगरपरिषदांमध्ये मतदान पार पडेल. तिस-या टप्प्यात १८ डिसेंबर रोजी १२ नगरपरिषदांमध्ये मतदान होईल. तर ८ जानेवारी रोजी चौथ्या टप्प्यात उर्वरित नगरपरिषदांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.

More from this channel