Battery box theft disrupted services on Western Railway
552 views · Published 20 June 2016 · 0:35 · Indexed 12 November 2026
Channel: Loksatta · 2016 · News & Politics
Battery box theft disrupted services on Western Railway माहिम वीज केंद्रातील बॅटऱ्य़ाच चोरीला गेल्याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सोमवारी सकाळी सव्वा अकरापासून सुमारे तासभर ठप्प झाली होती. यामुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. दुपारी १२.२५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने होते आहे. माहिम स्थानकावरील बॅटरी चोरीला गेल्याने विद्युतप्रवाह खंडीत झाल्याचा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला. पश्चिम रेल्वे मार्गावरील अप-डाउन आणि जलद-धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच, तांत्रिक बिघाडामुळे लोकलमधील पंखे, लाईट्सही बंद करण्यात आले होते. ऐन गर्दीच्या वेळीच लोकांचा खोळंबा झाल्याने अनेक रेल्वे प्रवाशांनी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन चालत आपली वाट पकडली. दादर, अंधेरी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. - See more at: http://www.loksatta.com
More from this channel
-
1:55
Major fire at Mantralaya building in Mumbai
-
4:03
Anjali Vedpathak-Bhagwat - Indian shooter : I scored my best Score
-
4:20
Your art should be good -- Bela Shende
-
1:16
Madhav Gadgil on Foreign Direct Investment (FDI)
-
1:48
It's impossible to achieve 8-9% growth rate for India - Madhav Gadgil
-
5:52
Western Ghat is getting affected by ecologically insensitive projects - Madhav Gadgil
-
2:12
I am not against private businesses & capitalism - Madhav Gadgil
-
4:31
Government's money needs to be accountable - Madhav Gadgil