Terrorists Attack Christian Colony In Paks Peshawar

288 views · Published 2 September 2016 · 1:07 · Indexed 24 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

पाकिस्तानला शुक्रवारची सकाळ वेदनादायक ठरली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४ दहशतवाद्यांसह ८ नागरिक ठार झाले. पहिला हल्ला पेशावर येथील ख्रिश्चन काॅलनीत झाला. पण तिथे सुरक्षा दलाने त्वरीत कारवाई करत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त रॉयटरने दिले आहे. हल्ल्यातील जखमींबाबत माहिती समजू शकलेली नाही. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा हल्ला झाला. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, खैबर पख्तुनवा प्रांतातील मर्दान शहरात सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. यामध्ये ८ जण ठार तर  सुमारे ४० जण जखमी झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

More from this channel