राजगड सुवेळा माची उतरताना धारकरी : Rajgad fort
466 views · Published 5 March 2017 · 0:40 · Indexed 26 October 2026
Channel: Arjun Said · 2017 · Autos & Vehicles
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड Pali Darwaza Rajgad.jpg पाली दरवाजा, राजगड किल्ला राजगडचे ठिकाण दाखविणारा नकाशा राजगडचे ठिकाण दाखविणारा नकाशाराजगड नाव राजगड उंची १३९४मी. प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत जवळचे गाव कर्जत, पाली डोंगररांग पुणे ,राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजीच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो.राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजीने महाराज हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने.
More from this channel
-
0:47
HAPPY BIRTHDAY : Nishant Nabge Dingrajwadi Pune
-
3:19
Kusti : Official Trailer Now In Cinemas Kusti
-
0:28
Sairddhi Cable Network Cable Advertisement
-
13:45
Sanasawdi Pune : Om Abhay funny Boys
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
1:05
Bailgada Sharyat Pune India
-
0:17
Dangerous Bull race in hindusthan
-
2:05
New Palace Kolhapur City