Pandharpur Wari : पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा
408 views · Published 1 September 2016 · 3:39 · Indexed 20 September 2026
Channel: Arjun Said · 2016 · Autos & Vehicles
धार्मिक व सांस्कृतिक परंपरा : वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी करणार्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. वारीचे दोन प्रकार : आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात आपापल्या गावाहून येतात. कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. इतिहास : पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पान्दारीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.
More from this channel
-
4:52
Asia Plateau Panchagani Training : Pralhad Darekar
-
4:58
Shivjayanti Speech In Sanasawadi Pune
-
0:57
How to swim well India
-
0:31
बैलगाडा शर्यत | gaon gada गावगाडा | Bull | Khilar Bail
-
0:33
Bullok Cart Race | gaon gada गावगाडा | बैलगाडा शर्यत
-
0:20
Bailgada Sharyat| महाराष्ट्र बैलगाडा शर्यत | बैलगाड्यांच्या शर्यती
-
0:23
Bailgada Sharyat Ursechaya Gat
-
8:27
बैलगाडा मालक पै हिरामण दरेकर यांची प्रकट मुलाखत सणसवाडी