Former Arunachal Cm Kalikho Pul Found Dead

107 views · Published 9 August 2016 · 0:48 · Indexed 22 October 2026

Channel: Loksatta · 2016 · News & Politics

Watch on YouTube

अरूणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पूल हे मंगळवारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह फास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सूत्रांच्या माहितीनुसार, कालिखो पूल यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप या शक्यतेला दुजोरा देण्यात आलेला नाही.फेब्रुवारी २०१६ ते जुलै २०१६ या काळात त्यांनी अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते.   तत्कालीन मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्या गटातील १२ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कालिखो पूल मुख्यमंत्री झाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जुलैमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

More from this channel