जळगाव/सांगली : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला निर्विवाद वर्चस्व

4,780 views · Published 3 August 2018 · 1:09 · Indexed 18 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात मराठा-धनगर-मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. यासोबतच शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन राज्यात भाजप विरोधी वातावरण असल्याचं विरोधकांकडून सातत्याने बोललं जात आहे, अशा परिस्थितीत जळगाव आणि सांगली महापालिका निवडणुकांचे निकाल भाजपसाठी मोठा दिलासा मानला जातोय. कारण, हाती आलेल्या निकालानूसार जळगाव महापालिकेत भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. तर सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चारीमुंड्या चित करत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

More from this channel