CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
2,547 views · Published 12 May 2018 · 1:22 · Indexed 20 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या नगरसेवकाची चोरी पकडली गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचा नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटतून फाईल काढून शर्टात टाकून प्रदीप रामचंदानी यांनी चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने समोर आला. प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. 10 मे रोजीची ही घटना असून, मात्र काल रात्री सीसीटीव्ही समोर आले. उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आज गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान
-
0:47
औरंगाबाद : दोन गटात तुफान हाणामारी, महापौरांचं शांततेचं आवाहन
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
1:27
औरंगाबाद जाळपोळ : काही कंपन्यांची इंटरनेट सेवा शहरात बंद