मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात मराठा समाजाचा एल्गार, चंद्रकांत पाटील म्हणतात..

4,078 views · Published 21 July 2018 · 1:56 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणासाठी आज सलग चौथ्या दिवशी मराठा समाजाचा एल्गार पहायला मिळाला. 
ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन मराठा समाजातर्फे करण्यात आलं. 
सोलापुरातील शिवाजी चौक, संभाजी चौकात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान या चक्काजाममुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली. 
तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली. लातूरमधल्या औसा तालुक्यातही मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. तर औरंगाबादमध्ये मोर्चेकऱ्यांनी क्रांती चौकात ठिय्या मांडला. 
यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

More from this channel