जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात

2,070 views · Published 15 July 2018 · 0:49 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला थोड्यावेळापूर्वी सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं देखील लक्ष या निवडणुकीकडे आहे. नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी एकूण 73 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय.

More from this channel