मुंबई | पवईत पार्किंगच्या वादातून इनोव्हा चालकाने दुचाकी चिरडली

1,523 views · Published 19 September 2018 · 2:37 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या पवईत एक इनोव्हाचालक जाणूनबुजून स्कूटर चिरडत असल्याचा व्हीडिओ समोर आलाय... हा व्हीडिओ पवईतल्या प्रतिष्ठीत अशा जलवायू विहार परिसरातला आहे... या व्हीडिओवेळी इनोव्हाचालक आणि दुचाकीचालकामध्ये पार्किंगवरुन वाद झाला होता.. रविंद्र पवार आपल्या सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी स्कूटी रस्त्यावर पार्क करुन गेले होते.. त्याचवेळी विजय नावाचा व्यक्ती तिथं इनोव्हा कार घेऊन आला... त्याने नेहमीच्या कार पार्किंगच्या जागी दुचाकी पाहिली असता त्याच्या रागाचा  पारा चढला.. यावेळी रविंद्र आणि विजय  यांच्यात वादावादी आणि  हाणामारी देखील झाली... याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

More from this channel