712 | परभणी | शेतकऱ्यांचा मोल मातीमोल होणार, कारवाईती मागणी
744 views · Published 31 August 2018 · 1:04 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वैधानिक किमान किंमत कायद्यातल्या दंड आणि शिक्षेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दंड थोपटल्याने राज्यभरातल्या अनेक बाजार समित्या ठप्प झाल्या आहेत... परिणामी शेतकऱ्यांचा माल सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे... शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या शिक्षेविरोधात बाजार समित्यांना टाळे लावले आहे. खरं तर यंदा मूग आणि उडदाचे पीक चांगले आले होते... त्याला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा असतानाच आता खरेदीच बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत... एकट्या परभणी जिल्ह्यातल्या 11 बाजार समित्या ठप्प झाल्या आहेत... हिंगोलीमध्ये हळदीचा व्यापार बंद झाला होता... तर मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद झाले... अकोल्यातल्या अकोट, मूर्तिजापूर आणि तेल्हारा या मोठ्या बाजार समित्यांमधील धान्य खरेदी कालपासून बंद आहे. बुलडाण्यातल्य़ा खामगाव आणि चिखलींसारख्या मोठ्या समित्याही यामुळे ठप्प पडल्यायेत. लातूरमध्येही अशीच परिस्थिती आहे.. त्यामुळे किमान सरकारने तरी नाफेड मार्फत माल खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!