मुंबई : अंगारकीनिमित्त भाविकांची सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी

3,657 views · Published 31 July 2018 · 5:15 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाची रात्री 12 वाजता विशेष महापूजा करण्यात आली. अंगारकी चतुर्थी असल्याने आज दिवसभर भाविकांची सिद्धिविनाय़क मंदिरात गर्दी असणार आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर मंगळवारी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र आज अंगारकी आणि मंगळवार असा दुहेरी योग जुळून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

More from this channel