मुंबई : नसीम खान यांच्यासारख्या लोकांवर समाजाने बहिष्कार टाकायला हवा : मनिषा कायंदे

834 views · Published 18 September 2018 · 1:29 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त तुफान पैसे उधळले गेले आहेत. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  चांदिवली इथल्या हिमालय मित्र मंडळात काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे कालच नसीम खान यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पेट्रोल दरांबाबात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच आमदारांवर पैसे उधळण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  नसीम खान हे चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत. गणेशोत्सवातही अश्या प्रकारे पैशांची उधळण योग्य आहे का., असा प्रश्न लोकांकडून विचारला जातोय.

More from this channel