नाशिक | तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव अखेर मागे

4,283 views · Published 31 August 2018 · 2:23 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजप नगरसेवकांनी मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेतला. मुख्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे नगरसेवक बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.
शनिवारी 1 सप्टेंबरला आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सत्ताधारी भाजपने केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भाजपला झटका देत तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. यानंतर नगरसेवकांनी हा ठराव अखेर रद्द केला आहे.

More from this channel