कोल्हापूर | कोल्हापुरातील दसरा चौकात शाही दसऱ्याचा थाट
2,514 views · Published 18 October 2018 · 4:21 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठय़ा उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा झाला. ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून सीमोल्लंघन करण्यात आले. शमीपूजन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी ऐतिहासिक दसरा चौकात सोने लुटण्याच्या सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही या सोहळ्याला उपस्थिती लावली. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या असंख्य नागरिकांनी पालख्यांवर सोन्याची म्हणजेच आपटय़ांच्या पानांची श्रद्धेने उधळण केली. . श्रीमंत शाहूमहाराजांनी शमीपूजन केले. शमीपूजन झाल्यानंतर देवीची आरती झाली आणि छत्रपतींनी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांच्या मुहूर्तावर शमीचं पान हळूवारपणे खुडताच, हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही