नवी मुंबईतील नेरुळ-खारकोपर लोकलसेवेचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण | नवी मुंबई | एबीपी माझा

3,962 views · Published 11 November 2018 · 3:59 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

नवी मुंबईला उरणशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचं आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून ही लोकल नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. नव्या लोकल मार्गावरचा हा पहिला टप्पा आहे. सीबीडी बेलापूर ते खारकोपर आणि सीवूड्स ते खारकोपर असे हे 2 मार्ग असणार आहेत. 
दिवसभरात लोकलच्या 40 फेऱ्या होणार असून सकाळ आणि संध्याकाळ या फेऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. पुढे हीच मार्गिका उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आज रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक नव्या कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel