How to swim - उन्हाळ्यात पोहायची मजा

1,930 views · Published 10 June 2017 · 1:16 · Indexed 28 September 2026

Channel: Om Said · 2017 · People & Blogs

Watch on YouTube

सणसवाडी पुणे  – शिरूर  तालुक्‍यांतील गावागावात उन्हाची तिव्रता प्रचंड वाढली असून, त्यामुळे या उन्हाळ्यात गारवा घेण्यांसाठी गावकडच्या जुन्या विहिरीत कित्येक वेळ डुंबून युवक पोहण्याचा आनंद घेत आहेत. माठातील पाणी,आइस्क्रीम, छताच्या पंख्यांची हवा आणि विहिरीत डुबकी… उन्हाच्या झळांपासून दूर राहून गारवा मिळवण्यासाठी शिरूर मध्ये  नागरिक असा आनंद मिळवत आहेत. मात्र, कष्टकरी कामगारांना उन्हापासून सुटका नाही.
तालुक्‍यातील बावीस गावे सतत पाण्यावाचून वंचित ठेवले जात आहेत.कासारी चव्हाणवाडी, निमगाव म्हाळुंगी, वाजेवाडी या गावांत तर ओला चाराही पाहायला मिळत नाही. नागरिकांना आणि जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कित्येक ठिकाणी चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यातच आता उन्हाच्या तीव्र झळा होरपळून काढत आहेत. अशा वेळी शहरातील आणि गावातील पुरातन विहिरींमध्ये युवक, शाळकरी मुले थंडाव्यासाठी पोहण्यासाठी गर्दी करीत आहेत. विहिरीत पोहणे ही गोष्ट अलीकडच्या काळात दुर्मिळ झाली होती, ती यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा दिसत आहे.
या बाबत रोज पोहण्याचा आनंद घेणारे युवक अर्जुन सैद आणि बबलू सोलंकी म्हणाले की, आम्ही जरी सणसवाडीत  राहत असलो तरीदेखील उन्हाच्या झळांपासून दूर राहण्यासाठी जवळच असलेल्या विमान तळ विहिरीमध्ये  डुंबण्यासाठी मित्रांसोबत जात असतो. पोहण्यातून एक वेगळाच आनंद मिळतो आहे.

More from this channel