नाशिक | घोटी-सिन्नर रस्त्याची दुरवस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष

3,418 views · Published 20 August 2018 · 2:31 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आता आम्ही तुम्हाला जे दृश्यं दाखवणार आहोत ते पाहून तुम्ही म्हणाल हा रस्ता हा की तळे असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. घोटी ते सिन्नर महामार्गावरील रस्त्यांची ही अवस्था असून पावलोपावली भले मोठे खड्डे बघायला मिळतायेत. मुंबईहुन शिर्डी सोबतच भंडारदाऱ्याला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे, रोज हजारो  पर्यटक या मार्गाने प्रवास करत असतात, मात्र  खड्डयांमुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय . याप्रकरणी तक्रार करून देखील याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय..

More from this channel