नागपूर | 'डेई' वादळामुळे विदर्भातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस

1,136 views · Published 22 September 2018 · 0:57 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ओडिशामध्ये हाहाकार माजवल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये डेई वादळाने धडक दिली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका देशातील आठ राज्यांना बसणार असून या राज्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 
हवामान विभागानं हा इशारा दिला आहे. डेई वादळाने देशातील अर्ध्याधिक राज्यांमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. वादळामुळे दिल्लीतील वातावरणही बदललंय...दिल्लीतही जोरदार पाऊस झाला. शिवाय डेईमुळे दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. नागरिकांची तारांबळ उडाली.

More from this channel