मुंबई : मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले 556 खड्डे बुजवणारा 'बाप'माणूस

1,854 views · Published 29 July 2018 · 1:24 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरून एक बाप आपल्या काळजावरच्या जखमा भरण्याचं काम करतोय. दादाराव भिलोरे यांनी मुंबईतले 556 खड्डे बुजवण्याचं काम केलं आहे. तीन वर्षांपूर्वी दादाराव यांच्या मुलाचा मुंबईतच अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर खचून न जाता, दादाराव यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. आज मुलाच्या तिसऱ्या स्मृतीदिनी एका दिवसात त्यांनी 100 खड्डे बुजवले. आतापर्यंत दादाराव यांनी एकट्याने सुरु केलेल्या मोहिमेत अनेक संस्थाही जोडल्या गेल्या. आणि त्यांच्या माध्यमातून 556 खड्डे बुजवण्यात आले आहेत.

More from this channel