पुणे | सचिन अंदुरेला राजकीय दबावातून अटक, वकिलांचा आरोप

2,179 views · Published 19 August 2018 · 0:49 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेला ७ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे..त्यामुळं २६ ऑगस्टपर्यंत अंदुरे सीबीआयच्या कोठडीत असेल..अंदुरेला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं..यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..राजकीय दबाव असल्यानं अंदुरेला अटक करण्यात आल्याचा दावा अंदुरेचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी केला...तर अंदुरे हा डॉ. दाभोलकरांचा प्रत्यक्ष मारेकरी असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेलें शस्त्र ताब्यात घ्यायचं आहे. असं सीबीआयच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं..  दरम्यान सचिन अंदुरेला राजकीय दबावाखाली गोवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वकीलांनी केला आहे..

More from this channel