ब्रेकफास्ट न्यूज : पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातील सात जण बेपत्ता

4,634 views · Published 23 August 2018 · 3:01 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या दोन कुटुंबांशी कालपासून संपर्क होत नाहीये. मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले आहेत. दोन्ही कुटुंबप्रमुखांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.

सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं आपल्या कुटुंबासह पानशेतला फिरायला गेले होते. त्यांनी खडकवासलामधील अॅक्वेरियस हॉटेलात मुक्कामही केला.

सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं. मात्र काल (बुधवारी) दुपारी 11 वाजल्यापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद येत आहेत.

याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस या दोन्ही कुटुंबांचा शोध घेत आहेत.

More from this channel