मुंबई | घनकचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने झापल्यावर सरकारला जाग, दंडाची तरतूद

892 views · Published 7 September 2018 · 0:44 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

घनकचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमधील नवीन बांधकामांना बंदी आणल्यानंतर, राज्य सरकारला जाग आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सरकारने आता दंडाच्या तरतुदीच बडगा उगारला आहे. ‘अ’ ते ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यावर कचरा, धूळ टाकून घाण केल्यास 180 रुपये, रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी केल्यास 200 रुपये, उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्ती, संस्था, दवाखाने, चित्रपटगृह, हॉटेल इत्यादी कुणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास जाग्यावर दंड आकारले जाईल. दंडाच्या या तरतुदीच्या निर्णयाची आजपासून तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

More from this channel