रायगड : 24 तासात माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पावसाची नोंद : स्कायमेट

3,693 views · Published 15 July 2018 · 0:42 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस झाला असल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. 24 तासात याठिकाणी 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरानसोबतच महाड, माणगाव, पोलादपूर या परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय कर्जत, उरण परिसरातील रिमझिम पाऊस होतोय. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 48.19 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून माथेरान येथे सर्वाधिक 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या तीन दिवसात रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

More from this channel