पुणे | पुणे महापालिकेच्या सात नगरसेवकांचं पद धोक्यात

3,170 views · Published 10 September 2018 · 1:22 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांवर राज्यभरात कारवाई सुरु आहे. पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचं रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे.

यामध्ये भाजपचे पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या या नगरसेवकांचे पद जाणार आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, महापालिका आयुक्तांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांबद्दल अहवाल तयार करण्यास सांगण्यात आलं होतं.

आयुक्तांनी सर्व प्रकरणांची पडताळणी करुन पद रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे पद रद्द होण्याची आता केवळ औपचारिकता बाकी आहे.

More from this channel