ब्रेकफास्ट न्यूज| सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी

573 views · Published 27 August 2018 · 1:55 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सध्या अटकेत असलेल्या सचिन अंदुरे याच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आलेलं पिस्तुल गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरल्याचा खळबळजनक दावा सीबीआयनं केला आहे. काल सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची कोठडी संपत आल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी सीबीआयनं हा दावा केलाय. आपल्या दाव्यानंतर अंदुरे आणि कळसकर या दोघांची
एकत्रितपणे चौकशी करायची आहे, त्यामुळे कोठडी वाढवून द्या, अशी मागणी सीबीआयनं केली.  यानंतर ३० ऑगस्टपर्यंत सचिन अंदुरेची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआय कोठडी दरम्यान दाभोलकर हत्या प्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रगती अहवाल सीबीआयनं कोर्टात सादर करावा, असंही कोर्टानं म्हटलं. 
Breakfast News @9AM : Pune : Sachin Andure's PC Extended till 30th Aug 27:08:2018

More from this channel