दारूच्या नशेत एअर इंडियाच्या दोन वैमानिकांकडून उड्डाण | मुंबई | एबीपी माझा
1,056 views · Published 12 November 2018 · 0:57 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दारूच्या नशेत विमान चालवायला निघालेल्या दोन वैमानिकांवर एअर इंडियाने कारवाई केली आहे. एअर इंडियाचे दोन सिनियर वैमानिक वेगवेगळ्या दोन विमानांना घेऊन उडण्याच्या तयारीत होते. दिल्ली ते लंडन विमानाचा पायलट दोन वेळा अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला तर दिल्ली ते बँकॉक विमान घेऊन निघालेल्या सहचालकाने अल्कोहोल टेस्टच केली नाही. पहिल्या घटनेत एअर इंडियाचे डायरेक्टर आणि चीफ ऑफ ऑपरेशंस कॅप्टन अरविंद कठपालिया यांच्यावर कारवाई केली आहे. कठपालिया AI-111 विमान दिल्लीहून लंडनला घेऊन जाणार होते. मात्र त्याआधी झालेल्या अल्कोहोल टेस्टमध्ये ते फेल झाले. त्यामुळे त्यांना विमान उडविण्यापासून रोखण्यात आले. दुसऱ्या घटनेत एअर इंडियाच्या दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात सहचालकाने उड्डाण करण्यापूर्वी अल्कोहोल टेस्ट न केल्याने कारवाई करण्यात आली. 200 प्रवाशांना घेऊन निघालेले हे विमान उड्डाण घेतल्यानंतर परत बोलावले गेले. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!