ब्रेकफास्ट न्यूज | अंबरनाथमध्ये बाईकच्या कव्हरमध्ये सहा फुटी धामण

1,947 views · Published 8 October 2018 · 0:40 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दुचाकीच्या कव्हरमध्ये भलामोठा साप लपून बसल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली. अंबरनाथच्या बारकू पाड्यातील पंचशील अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीच्या कव्हरमध्ये मोठा साप लपल्याचं रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केलं. यावेळी गाडीच्या कव्हरमधून तब्बल सहा फूट लांब धामण जातीचा साप बाहेर आला आणि पळून जाऊ लागला. मात्र सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी साप यशस्वीपणे पकडला. हा साप विषारी नसून त्याला आता जंगलात सोडण्यात येणार आहे.

More from this channel