पुणे | पेट्रोल, डिझेल दरात वाढ, पुणेकरांच्या प्रतिक्रिया

4,354 views · Published 4 September 2018 · 2:33 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरांच्या विक्रमाचे थरारवर थर सुरुच आहेत. आज पेट्रोल प्रति लिटरमागे 16 पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे 20 पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86 रूपये 72 पैशांपर्यंत पोहोचलं तर डिझेलचे दर प्रति लिटर 75 रूपये 74 पैशांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या चार दिवसात पेट्रोल तब्बल 1 रुपया 62 पैशांनी महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे. इंधन दर महागल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे 39.12 टक्के मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत. तर अमरावतीत एक लिटर पेट्रोलसाठी 87 रूपये 97 पैसे मोजावे लागत आहेत.

More from this channel