पुणे : डीएसकेंचा मुलगा शिरीषची पोलिसांसमोर शरणागती, 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
2,321 views · Published 25 June 2018 · 3:16 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनाही अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत आज संपत होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळ ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या आणि कधीपर्यंत पोलिसांना शरण येणार याची आठ जूनपर्यंत हायकोर्टाला माहिती द्या, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!