पुणे | घरातलं पेस्ट कंट्रोल जीवावर, नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू
4,126 views · Published 26 September 2018 · 1:27 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
घरातील पेस्ट कंट्रोलमुळे नऊ वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला. सार्थक डोंगरे असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. पुण्यातल्या सिंहगड परिसरातील डोंगरे कुटुंबात सोमवारी घटना घडली. संदीप डोंगरे हे स्वत: पेस्ट कंट्रोलची कामे करतात. ढेकून झाल्यामुळे त्यांनी सोमवारी घरात पेस्ट कंट्रोल केले. त्यानंतर ते पत्नी आणि मुलांसह बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री घरी येऊन झोपी गेले. दरम्यान मध्यरात्री या सर्वांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सर्वांवर उपचार सुरु असताना सार्थकची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!