ब्रेकफास्ट न्यूज: कारगिल विजय दिनानिमित्त वीरचक्र विजेते नि.कर्नल गौतम खोत यांच्याशी बातचीत
620 views · Published 26 July 2018 · 20:58 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कारगिल युद्धाचे अनेक हिरोज आहेत. किंबहुना या युद्धात सहभागी झालेला प्रत्येक वीर जवान हा आपल्या देशाचा खराखुरा हिरो आहे. याच नायकांमधलं एक नाव आहे वीरचक्र विजेते रिटायर्ड कर्नल गौतम खोत. ------------- ५ जून १९९९ ला कर्नल खोत 'ऑपरेशन विजय'चा हिस्सा बनले. आर्मी एव्हिएशच्या टीमचे कर्नल खोत सदस्य होते. जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून बेस हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहचवण्याची आणि जवानांपर्यंत साधनसामुग्री पोहचवण्याची जबाबदारी त्यांच्या टीमवर होती. १५ हजार फुटांच्या उंचीवरचं उड्डाण, तब्बल चाळीस दिवस आणि १०० तास या ऑपरेशनमध्ये सहभागी होत त्यांनी आणि त्यांच्या टीमने त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. हातात कोणतंही शस्त्र नसताना वॉर फ्रंटवर जात शौर्यानं परिस्थितीला सामोरं गेल्याबद्दल कर्नल गौतम खोत यांचा वीरचक्रानं सन्मान करण्यात आला. कारगिल युद्धाच्या आठवणी, ऑपरेशन विजय दरम्यानचे त्यांचे अनुभव - वीरचक्र विजेते रिटायर्ड कर्नल गौतम खोत यांच्याशी बातचीत
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!