कल्याण | कल्याणचा पत्री पूल धोकादायक, लवकरच वाहतुकीसाठी बंद
1,898 views · Published 19 August 2018 · 2:13 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन होणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद करावी, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काढली आहे. त्यामुळे हा पूल लवकरच बंद होणार आहे. कल्याण आणि डोंबिवली, तसंच शिळफाटा-भिवंडी या शहरांना जोडण्यासाठी पत्री पूल हा एकमेव मार्ग सध्या अस्तित्वात आहे. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेनंतर या पुलाच्या जीर्णावस्थेकडे यंत्रणेचं लक्ष गेलं आणि पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. यात हा पूल धोकादायक असल्याचं समोर आल्यानं तातडीनं पुलावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक बाजूच्या नवीन पुलावरुन वळवण्यात आली होती. आता मात्र हलकी वाहनंच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही या पुलावरुन जाऊ देऊ नये, अशा प्रकारची स्पष्ट अधिसूचना वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे. हा पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!