कर्नाटक : मुलं पळवण्याच्या संशयातून तिघांना बेदम मारहाण
2,933 views · Published 14 July 2018 · 1:01 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटकच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात मुलं पळवण्याच्या संशयातून तीन लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाला. आज संध्याकाळच्या सुमारास हैदराबाद येथील आझम, मोहम्मद सलमान, सलामत कुरेशी हे तीन युवक नवीन चारचाकी वाहन घेऊन हंदीखेर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. ते आज हैदराबादकडे परतत होते. दरम्यान, बटकल व हांदीखेर तांड्यावरील विद्यार्थी शाळेतून परतत होते तेव्हा या तिघे युवक विद्यार्थ्यांना चॉकलेट देत होते. ही वार्ता तांड्यावरील नागरिकांना समजली त्यामुळे त्यांनी मुले पळविणारी टोळी आली आहे, असे समजून त्यांचा पाठलाग सुरु केला. मुकीर्तील नागरिकांनी तरुणांचं वाहन अडवलं. घाबरलेल्या युवकांचा वाहनावरील ताबा सुटून जवळच्या पुलावरून खाली कोसळले. या युवकांनी कमलनगर पोलिसांना संपर्क साधून ही माहिती दिली़ त्यामुळे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले़ पोलीस येईपर्यंत नागरिकांनी या युवकांना बेदम मारहाण केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!