शिवस्मारकाच्या जागेवर नगररचना विशारद चंद्रखेशर प्रभू यांच्याशी चर्चा | ब्रेकफास्ट न्यूज

1,590 views · Published 27 October 2018 · 15:37 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित झालेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावं अशी मागणी होतीये. 
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा अट्टाहास सोडून सरकारनं राजभवनाच्या जागेवर स्मारक उभारावं. अशी मागणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर य़ांनी केलीय. सोबतच शिवस्मारकाची नियोजित जागा अत्यंत चुकीची असल्याचं मत निवृत्त अॅडमिरल I.C. राव यांनी मांडलंय.
तर तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात न होता रायगड किल्ल्याच्या परिसरातील डोंगरावर व्हावं अशी मागणीही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारक समुद्रात बांधण्याच्या मागील तांत्रिक बाजू कशा असतात, त्यातली तांत्रिक आव्हानं कोणती असतात, ते कितपत व्यवहार्य असतं हे सगळं जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नगररचना विशारद चंद्रखेशर प्रभू यांच्याकडून.

More from this channel